🌿 निसर्गाच्या कुशीत वसलेले तोंडली 🌿
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात, निसर्गाच्या कुशीत वसलेले ‘तोंडली’ हे एक अविश्वसनीय निसर्गरम्य गाव आहे
नयनरम्य निसर्गसौंदर्य
आमच्या गावचे सौंदर्य खऱ्या अर्थाने खुलवतात ते गावच्या चारही बाजूंना असलेले उंचच उंच हिरवेगार डोंगर. या डोंगरांच्या पायथ्याशी बारामाही वाहणाऱ्या नद्या, जणू गावाला लाभलेला एक अनमोल दागिना आहेत.
त्यातच, या हिरव्यागार डोंगरामधून वाट काढत धावणारी नागमोडी वळणाची वाट, गावच्या सौंदर्यात अधिकच भर घालते.
आमची ग्रामसंस्कृती
गावात प्रवेश करताच, गावच्या वेशीवर वसलेले श्री ग्रामदेवता मानाई देवीचे मंदिर, प्रत्येकाचे स्वागत करते.
गावातून फिरताना रस्त्याच्या दुतर्फा दाटीवाटीने वसलेली पारंपरिक कौलारू घरे पाहणे, हा एक विलोभनीय अनुभव असतो. पण या सर्वापेक्षा मौल्यवान आहे तो “गावातील लोकांचा एकोपा; हाच आमच्या गावाचा खरा साज शृंगार आहे.”
गावात प्रामुख्याने कुणबी समाजाची वस्ती असून, गणेशोत्सव, होळी आणि गुढीपाडवा यांसारखे पारंपरिक सण आम्ही सर्व गावकरी मोठ्या आनंदाने आणि एकजुटीने साजरे करतो.
आमची श्रद्धास्थाने
श्री ग्रामदेवता मानाई देवी मंदिर
592.३६ हेक्टर
भौगोलिक क्षेत्र
39६
एकूण लोकसंख्या
206
एकूण घरे
80.27
एकूण साक्षरता
